राज्य कामगार विमा रूग्णालयाला आग

राज्य कामगार विमा रूग्णालयाला दुपारच्या सुमारास आग लागली होती. महापालिकेचं अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं त्वरीत धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. वागळे इस्टेट मध्ये राज्य कामगार विमा रूग्णालय आहे. या रूग्णालयाच्या भांडारगृहाला दुपारच्या सुमारास आग लागली होती. या आगीत भांडारगृहातील कागदपत्रांची राख झाली आहे. सुदैवानं या आगीत कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

Leave a Comment

%d bloggers like this: