धनत्रयोदशी उत्साहात साजरी

आज धनत्रयोदशी. प्रदोषकाली अश्विन कृष्ण त्रयोदशी असेल त्यादिवशी धनत्रयोदशी असते. धनत्रयोदशीला दीपदान करण्यास सांगितलेले आहे. तसंच परोपकार करण्यास सांगितले आहे. त्यासंबंधीची एक पौराणिक कथाही आहे. गरीब- गरजूनाही दीपावलीचा उत्सव साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश आहे. व्यापारी लोक या दिवशी नवीन वर्षाच्या हिशोब लिहीण्याच्या वह्या आणतात. महिला घरातील सोन्याचे दागिने स्वच्छ करून त्यांची व धनाची पूजा करतात. या दिवशी धन्वंतरी यांचा जन्म झाला. त्यांची जयंती साजरी केली जाते. दक्षिण दिशा आपल्याकडे अशुभ मानली जाते. पण या दिवशी यम दीपदानाचा दिवस म्हणून आज पहिला दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावला जातो. कणकेमध्ये किंचित हळद घालून पिवळ्या रंगाचा दिवा करून त्यात को-या वस्त्राची वात लावावी असं शास्त्र सांगतं. जो दीपोत्सव साजरा करेल आणि दीपदान करेल त्याला अपमृत्यू येत नाही असं मानलं जातं. धनत्रयोदशीचा दिवस डॉक्टरांच्या दृष्टीनंही विशेष महत्वाचा आहे. या दिवशी देव-दानवांच्या समुद्र मंथनातून धन्वंतरीचा जन्म झाला अशी कथा आहे. धन्वंतरी म्हणजे देवांचा वैद्य. त्यानं आयुर्वेदाचे १३ ग्रंथ लिहिले. धन्वंतरीनं अनेक औषधांचा शोध लावला. धनत्रयोदशीच्या दिवशी तिजोरी, कपाट यांची पूजा करून धने-गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. दीपावलीनिमित्त सर्व ठाणेकरांना ठाणेवार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीतर्फे हार्दीक शुभेच्छा. ही दीपावली आपल्याला सुखसमृध्दी, भरभराटीची आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारी जावो हीच आमच्या परिवारातर्फे शुभेच्छा.

Leave a Comment

%d bloggers like this: