गोवा येथे झालेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत क्षत्रीय वेखंडेनं चमकदार कामगिरी केली आहे. खुल्या वयोगटाच्या या स्पर्धेत क्षत्रियने राष्ट्रकुल बुध्दीबळ स्पर्धेतील १४ वर्ष गटाचा विजेता कार्तिक साईला बरोबरीत रोखत सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. यंदाच्या हंगामात क्षत्रियनं आपल्या वयाच्या मोठ्या गटात पहिल्या पाचात स्थान मिळवलं आहे. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धांमध्ये लक्षवेधी कामगिरी करणा-या क्षत्रियला सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ संघटनेचे १५७४ इतके गुणांकन मिळाले आहे. क्षत्रियनं वयाच्या पाचव्या वर्षापासून बुध्दीबळ खेळण्यास सुरूवात केली असून पटावर असलेल्या मोह-यांची स्थिती पाहून तो ऐन सामन्यात आपल्या रणनितीत बदल करतो. त्याच्या या खेळामुळे त्याचे प्रतिस्पर्धी नेहमीच अडचणीत येतात असे त्याचे प्रशिक्षक अमित पांचाळ यांनी सांगितलं.
