ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि कोसीआचे अध्यक्ष डॉ. मधुसुदन खांबेटे यांच्या पत्नी पद्माताई खांबेटे यांचं आज सकाळी पावणे नऊ वाजता त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झालं. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती मधुसुदन खांबेटे, मुलगा गिरीश खांबेटे ,स्नुषा गीता खांबेटे जावई विनोद वझे आणि नातवंडे असा परिवार आहे.
वसुंधरेचा औषधी ठेवा हे मराठी पुस्तक आणि नेचर्स मेडिसीनल ट्रेझर्स ह्या इंग्रजी पुस्तकाच्या त्या लेखिका होत्या. ह्याशिवाय घरगुती औषधीवर त्यांची अनेक छोटी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या पार्थिवावर जवाहर बाग स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोरोनामुळे प्रशासकीय नियम डोळ्यासमोर ठेवून सर्व मित्र परिवार आप्तेष्ट यांनी दिवंगत आत्म्यास लांबूनच श्रद्धांजली वाहावी असे आवाहन खांबेटे परिवारातर्फे करण्यात आले आहे.