ठाण्यामध्ये दुर्मिळ चारचाकी आणि दुचाकी वाहनांचं प्रदर्शन

ठाण्यामध्ये व्हिन्टेज आणि क्लासिक कारचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. ठाण्याची वाहतूक शाखा, व्हिन्टेज आणि क्लासिक कार फेडरेशन ऑफ इंडिया आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात दुर्मिळ वाहनं प्रदर्शित करण्यात आली आहेत. वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन आपलं शताब्दी वर्ष साजरं करत असून त्यानिमित्तानं १८९६ पासून १९८० पर्यंतची विविध वाहनं या प्रदर्शनात पहायला मिळतात. ट्रम्फ, बीएसए, हार्ले डेव्हीडसन, रॉयल एनफिल्ड, रोल्स रॉईल्स, बेन्टली, ऑल्विस, डॉज, कॅडिलॉक, फोर्ड, हडसन तसंच दुर्मिळ दुचाक्याही या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. या दुर्मिळ गाड्या रस्त्यावर बाहेर पडल्या की लोकांची नजर हमखास त्यांच्याकडे वळते. या गाड्या एकाच ठिकाणी पहायला मिळत आहेत. सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत हे प्रदर्शन आणखी दोन दिवस पहायला मिळणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading