crime TMC

महापालिकेच्या उद्यानातून फुलपाखरू चोरून नेणा-या दुकलीला गजाआड करण्यात ठाणे पोलीसांना यश

महापालिकेच्या उद्यानातून फुलपाखरू चोरून नेणा-या दुकलीला गजाआड करण्यात ठाणे पोलीसांना यश आलं आहे. पालिकेच्या पोखरण रस्ता क्रमांक २ वरील उद्यानाचं सुशोभिकरण करण्यात आलं होतं. या सुशोभिकरणाअंतर्गत रस्त्यांवरील झाडांवर फायबरची कृत्रिम फुलपाखरं लावण्यात आली होती. या फुलपाखरांची माहितीही देण्यात आली होती. मात्र गेल्या बुधवारी यातील गुलाबी आणि जांभळ्या रंगाचे फायबरचे एक फुलपाखरू चोरट्याने पळवून नेले होते. फुलपाखरू चोरीला गेल्याची तक्रार महापालिकेनं नोंदवली होती. पोलीसांनी याप्रकरणी कसून तपास करून निहाल सिंग आणि गोविंद चौहान या दोघा चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेले फुलपाखरूही हस्तगत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *