Health

सव्वा दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस सूर्यनमस्कार घालून नोंदवला एक नवीन विक्रम

ठाण्यामध्ये आज सव्वा दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस सूर्यनमस्कार घालून एक नवीन विक्रम नोंदवला आहे. ठाणे वैभव दैनिकातर्फे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्मार्ट ठाण्याबरोबरच ठाणे आरोग्यदायी व्हावं या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. रेमण्डच्या मैदानावर आज सकाळी ७ वाजता विविध ४० शाळांच्या २ हजार २४६ विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सूर्यनमस्कार घालून नवा विक्रम नोंदवला. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, खासदार श्रीकांत शिंदे तसंच इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Comment here