पंडीत राम मराठे स्मृती समारोहात सादर झालेल्या शास्त्रीय गायनाने ठाणेकर रसिक मंत्रमुग्ध

पंडीत राम मराठे स्मृती समारोहात सादर झालेल्या शास्त्रीय गायनाने ठाणेकर रसिक मंत्रमुग्ध झाले. समारोहाच्या दुस-या दिवशीच्या शेवटच्या सत्रात पंडीत राजेंद्र गंगाणी यांनी सादर केलेल्या कथ्थक नृत्यालाही ठाणेकरांनी उत्स्फूर्त दाद दिली. संगीत समारोहात २५ वर्षाहून अधिक काळ शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचा प्रदीर्घ अनुभव असणा-या दीपा पराडकर-साठे यांनी शास्त्रीय संगीतातील विविध राग सादर केले. ठाण्याच्या युवा कथ्थक नृत्यांगना श्रध्दा शिंदे यांनी बहारदार कथ्थक नृत्याचे सादरीकरण केले. गत, तोडे, ततकार, घुंगरांचा लयबध्द आवाज, तालवादकांसह नृत्याच्या जुगलबंदीने त्यांनी रसिकांची मनं जिंकली. पुण्यातील प्रसिध्द शास्त्रीय गायिका यशश्री कडलासकर यांनी यमन राग आणि भजन सादर करून महोत्सवाची रंगत वाढवली. तर युवा शास्त्रीय गायक रमाकांत गायकवाड यांनी त्यांच्या गायनानं अधिक रंगत वाढवली. रागेश्री या रागानं त्यांनी आपल्या गायनाला सुरूवात केली. त्यानंतर सैय्या फिर याद आये आणि का करू सजनी आये ना बालम ही ठुमरी सादर केली. परंपरा आणि जयपूर घराण्याची शुध्दता राखून अनेक प्रयोग करणा-या पंडीत राजेंद्र गंगाणी यांनी सादर केलेल्या कथ्थक नृत्याला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading