Rain

जिल्ह्यामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्के अधिक पाऊस

जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात पडणा-या नियमित पावसापेक्षा गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्के पाऊस अधिक झाला आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यामध्ये सरासरी आजपर्यंत २ हजार ५२३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तर यंदा याच कालावधीत म्हणजे १ जून ते ८ नोव्हेंबर या कालावधीत ४ हजार २३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. टक्केवारीमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास ६० टक्के पाऊस अधिक झाल्याचं दिसत आहे.

Comment here