geographical

येत्या सोमवारी बुधाचं होणारं अधिक्रमण भारतातून दिसणार नाही – दा. कृ. सोमण

येत्या सोमवारी बुधाचं होणारं अधिक्रमण भारतातून दिसणार नाही अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. पृथ्वीवरून पाहताना बुध ग्रह जेव्हा सूर्यबिंबावरून जाताना दिसतो त्यालाच बुधाचं अधिक्रमण म्हणतात. बुधाप्रमाणेच शुक्राचेही अधिक्रमण पृथ्वीवरून दिसते. बुध ग्रहाचे अधिक्रमण दुर्बिणीतून पहावे लागते. सूर्यग्रहणात जसे चंद्रबिंब सूर्यबिंबावरून जाताना दिसते तसाच हा प्रकार असतो. यापूर्वी ९ मे २०१६ मध्ये बुधाचे अधिक्रमण झाले होते. आता यानंतर पुन्हा १३ वर्षांनी नोव्हेंबर २०३२ मध्ये असा योग येणार आहे. शुक्राचे अधिक्रमण ६ जून २०१२ मध्ये झाले होते. आता ते ११ डिसेंबर २११७ मध्ये होणार असल्याचं खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Comment here