जिल्ह्यात उद्या पल्स पोलिओ मोहिमेचं आयोजन

जिल्ह्यातील मुरबाड, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ या चार तालुक्यातील आणि ठाणे नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर अशा ६ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उद्या पल्स पोलिओ मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोहिमेत ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ लस देण्यात येणार आहे. या मोहिमेत लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना १७ ते २० सप्टेंबर दरम्यान घरोघरी जाऊन पोलिओची लस दिली जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading