ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत ६ हजार १९० गणेश मूर्तींचं विसर्जन

पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवणा-या ठाणे महापालिकेनं पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत ६ हजार १९० गणेश मूर्तींचं विसर्जन केलं तर दीड, सात आणि दहा दिवसांचे मिळून एकूण ३७ हजार ३६१ गणपती मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. गणपती विसर्जनाच्या दिवशी ६ हजार १९० गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. यामध्ये ५ हजार ५७४ घरगुती, ४८२ सार्वजनिक गणपती तर ३६ गौरीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आलं. ठाणे महापालिकेच्या मूर्ती स्वीकार केंद्रामध्ये ९८ गणपतींचं विसर्जन करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading