राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत 13 वर्षीय मधुमिता नारायणने पटकावले अजिंक्यपद

ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा आणि शहर बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकॅडमीच्या 13 वर्षीय मधुमिता नारायणने अजिंक्यपद पटकावले. आपल्या घरच्या मैदानावर कारकिर्दीतले पहिले सुवर्ण पदक पटकवणाऱ्या मधुमिताला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते सुवर्णपदक देवून गौरवण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंच्या यशाच्या चढत्या आलेखावर समाधान व्यक्त करत अंतिम सामान्यांपर्यंत एकही गेम न गमावता सुवर्ण पदकापर्यंत धडक मारणाऱ्या मधुमिताच्या या यशाबद्दल रोख 25 हजार रुपयांचे विशेष बक्षीस जाहीर केले. ठाण्यात अलिकडेच दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading