accident

वाडा-पिवळी बसला झालेल्या अपघातात ५० विद्यार्थी जखमी

वाडा-पिवळी बसला झालेल्या अपघातात ५० विद्यार्थी जखमी झाले आहेत. आज सकाळी हा अपघात झाला. वाडा आगारातून ही बस पिवळी गावाला निघाली होती. सकाळी पावणेसातच्या सुमारास स्पीडब्रेकरवर ही बस आदळल्यानं बस चालकाचं बस वरील नियंत्रण सुटलं आणि ही बस बाजूच्याच शेतात घुसली. यामुळं बसमधील ५० विद्यार्थी जखमी झाले आहे. या बसमध्ये ६० प्रवासी होते. या बसमधील अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे हात आणि पाय फ्रॅक्चर झाले असून बहुतांश प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्वांना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Comment here