ठाण्यामध्ये कालपासून आज संध्याकाळपर्यंत पावणेदोनशे मिलिमीटरपावसाची नोंद

ठाण्यामध्ये काल आणि आज पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे गेल्या काही दिवसापासून अंगाची लाही लाही करणाऱ्या तीव्र उष्णतेपासून सुटका झाली आहे. मुंबई वेद्साळेन काल पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार काल संध्याकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासात 65 मिलिमीटर पाऊस झाला. तर आज सकाळी साडेआठपासून दुपारपर्यंत 95 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. या तुफानी पावसामुळे ठाण्यातील सखल भागात पाणी साचले होते. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विशेष म्हणजे पावसामुळे ठाण्यात मोठी वाहतूक कोंडी अनुभवायला मिळाली. ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेले पाहायला मिळाले, यामध्ये मखमली तलाव, उथळसर, सरस्वती इंग्लिश स्कूल, कामगार हॉस्पिटल, बी केबिन, साकेत रस्ता, माजीवाडा नाका अशा विविध ठिकाणी पाणी साचलं होतं. रेल्वेस्थानक परिसरातही पाणी साचल्यामुळे पलाटांना दबदब्याचे स्वरूप मिळालं होतं. रेल्वे मार्गावर पाणी आल्यामुळे उपनगरीय सेवा धीम्या गतीने धावत होती, इतक्या दिवस पाऊस नसल्यामुळे सर्वजन चिंतीत होते मात्र या मोसमातील पहिल्याच पावसाने सर्वना गारेगार करुन टाकले आहे,

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading