ठाणे महापालिकेची जानेवारी आखेरीस मालमत्ताकरापोटी ५९१ कोटी रूपयांची विक्रमी वसुली

ठाणे महापालिकेन जानेवारी आखेरीस मालमत्ताकरापोटी ५९१ कोटी रूपयांची विक्रमी वसुली केली आहे. महापालिकेचं महत्त्वाचं उत्पन्नाचे स्त्रोत म्हणजे मालमत्ता कर. यावर्षी महापालिकेने गेल्या संपूर्ण वर्षभरात जी वसुली केली होती ती वसुली यंदा जानेवारी 2023 अखेरपर्यत पुर्ण केली आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठाणेकरांना मालमत्ता कर भरण्याबाबत आवाहन केले होते, त्या आवाहनाला प्रतिसाद देवून नागरिकांनी कर भरणा केल्याने आयुक्तांनी ठाणेकर करदात्यांचे आभार व्यक्त केले आहेत. मालमत्ता कराचा भरणा वेळेवर व्हावा यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी वेळोवेळी बैठका घेवून संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते आणि त्यानुसार योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. नागरिकांना कर भरणे सुलभ व्हावे यासाठी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी महापालिकेची सर्व प्रभाग कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती तसेच ऑनलाईन प्रणाली सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली होती. आयुक्त बांगर यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ठाणेकरांनी मालमत्ता कराचा भरणा केल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत जानेवारी 2023 अखेरीस महापालिकेने 110 कोटीचा अधिकचा मालमत्ता कर वसुल केल्याची माहिती आयुक्तांनी दिली. यावर्षी जानेवारी पर्यंत ५९१ कोटी रुपये मालमत्ता कर वसुल झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच जानेवारी २०२२ पर्यंतची वसुली ही ५९१ कोटी होती, ती या वर्षी जानेवारी महिन्यातच पूर्ण झाली आहे, यामध्ये चालू वर्षी उथळसर प्रभाग समिती 39.88 कोटी, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती 72.26 कोटी, कळवा प्रभाग समिती 20.46 कोटी, मुंब्रा प्रभाग समिती 24.31 कोटी, दिवा प्रभाग समिती 26.78 कोटी, वागळे इस्टेट प्रभाग समिती 19.53 कोटी, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती 22.99 कोटी, वर्तकनगर प्रभाग समिती 84.65 कोटी, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती 206.37 कोटी आणि मुख्यालयाकडे 75.66 कोटींची वसुली झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading