ठाण्यातील बाल कलाकार अथर्व वगळ यानं तयार केली चला बनवू प्लास्टीकमुक्त ठाणे शॉर्ट फिल्म

ठाण्यातील बाल कलाकार अथर्व वगळ यानं ठाण्यातील वाढते प्लास्टीक प्रदूषण नियंत्रण रोखण्यासाठी चला बनवू प्लास्टीकमुक्त ठाणे अशी शॉर्ट फिल्म तयार केली आहे. या लघु चित्रपटाद्वारे प्लास्टीक पिशव्या वापरू नये आणि सर्वांनी कापडी पिशव्या वापराव्यात यासाठी जनजागृतीचा प्रयत्न केला आहे. अथर्व वगळ हा सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. आत्तापर्यंत त्याने अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिका, जाहिरात आणि लघुपटात काम केलं आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातही मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालपणाची भूमिका त्याने साकारली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading