सांगितिक मैफलीने संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोहाचा समारोप

तबला–मृदुंगावर थिरकणारी बोटे, बासरी-व्हायोलिनमधून निघणारे सूर, संतूर वादनाची साथ,कथ्थक नृत्याच्या ठेका आणि ‘सौभद्र’ संगीत नाटकाला मिळालेली रसिकांची उत्स्फूर्त दाद घेत कलावंतांनी संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोहाच्या मैफलीचे समारोपाचे पुष्प गुंफले. राम मराठे महोत्सवात कला सादर करण्याची संधी तिसऱ्यांदा मिळाली असून पं. राम मराठे यांच्या नावाने हा महोत्सव ठाणे महापालिका करीत असून हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे उद्गगार संतूरवादक पद्मश्री पं. सतीश व्यास यांनी काढले. संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सवाला ठाणेकर रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. शास्त्रीस संगीतातील नामवंत कलावंतांची कला नागरिकांना पाहायला मिळाली. यापुढेही ठाण्यातील कलावंतांच्या माध्यमातून देशविदेशातील कलावंतांच्या कलेचा अविष्कार ठाणेकरांना पाहायला मिळेल यासाठी निश्चितच ठाणे महापालिका प्रयत्न करेल असा विश्वास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरूवात निधी प्रभू यांच्या कथ्थक नृत्याने करण्यात आली. शास्त्रीय संगीतातील रागावर आधारित तोडे सादर करीत निधी प्रभू यांनी रसिकांची विशेष दाद मिळवली. तर कल्याणी साळुंखे यांनी सादर केलेल्या शास्त्रीय गायनाने या मैफलीत अधिकच रंगत आणली. दुसऱ्या सत्रात गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट, पुणे प्रस्तुत आणि मराठी रंगभूमी पुणे निर्मित सादर करण्यात आलेल्‌या ‘संगीत सौभद्र’ या संगीत नाटकाची मेजवानी रसिकांना मिळाली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading