राज्य वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंची सर्वोत्कृष्ट कामगिरी

जळगाव येथे झालेल्या राज्य वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत युथ जुनिअर आणि सीनियर गटात जिल्ह्याने घवघवीत यश मिळविले आहे. या स्पर्धेत 5 सुवर्णपदक, 6 रोप्य पदक, 3 कांस्यपदक अशी एकूण 14 पदके मिळवून ठाण्यातील खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामध्ये वेदिका टोळे युथ 49 किलो रौप्य पदक, माही बाभुळकर युथ सुवर्णपदक आणि ज्युनियर ५५ किलो रौप्य पदक, केतकी पाटील ज्युनिअर सुवर्णपदक आणि सिनियर 64 किलो रौप्यपदक,श्रुती मोर ज्युनियर रौप्य पदक आणि सिनियर 64 किलो ब्राँझ, वीणा ठाकरे युवा 64 किलो रौप्य पदक,ग्रीष्मा थोरातला युथ 76 किलो सुवर्णपदक, शिवतेज पवार 81 किलो कांस्य पदक, सानिध्य मोरे युथ सुवर्णपदक आणि ज्युनियर 89 किलो सुवर्णपदक, तेजस लोखंडेला सिनियर 89 किलो रौप्य पदक, शुभम लोखंडे ज्युनियर 102 किलो कांस्य पदक अशी पदकांची कमाई केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading