जिल्ह्यातील एचआयव्ही पॉझिटिव्हीटी रेट कमी

राष्ट्रीय एड्स नियंत्रण महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मातेकडून बालकांना होणारे एचआयव्ही संक्रमण निर्मूलन समिती बैठकीचा आढावा शिनगारे यांनी घेतला.

या बैठकीमध्ये जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण समिती, जिल्हा एड्स् क्षयरुग्ण समन्वय समिती, मानवाला होणारे एचआयव्ही संक्रमण निर्मूलन समिती मधील विविध घटकावर सादरीकरण करण्यात आले होते. जागतिक एड्स दिन आणि सप्ताह निमित्ताने जिल्हयातील कार्यक्रमांची माहिती देण्यात आली.  जिल्हयातील एचआयव्ही प्रिव्हेलेस रेट आणि पॉजिटिव्हीटी रेट खुपच कमी झाल्याने  जिल्हाधिका-यांनी समाधान व्यक्त केले. एड्स रुग्ण आणि क्षय रुग्ण यांच्यावर होणाऱ्या औषध उपचारावर चर्चा करण्यात आली. बालसंगोपन योजना गरोदर मातांची तपासणी ही शासकीय रुग्णालयामध्ये शंभर टक्के होत असून, खासगी रुग्णालयातील सर्व गरोदर मातांची याबाबतची माहिती येण्याकरिता प्रयत्न सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आलं.  कामाच्या ठिकाणी एचआयव्ही-एड्स विषयी भेदभाव होऊ नये अशा सुचना जिल्हाधिकारी शिनगारे यांनी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading