९ दिवसांच्या जागरानंतर आदिशक्तीला भावपूर्ण वातावरणात निरोप

कोरोनाचे निर्बंध नसल्यामुळे नवदुर्गेचा उत्सव जल्लोषात साजरा झाला. काल ९ दिवसांच्या जागरानंतर त्या आदिशक्तीला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ६ हजार २८० देवींच्या मूर्ती, प्रतिमा आणि घटांचं विसर्जन करण्यात आलं. फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांचा गजर आणि गुलालाच्या उधळणीत देवीला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ठिकठिकाणी देवीच्या विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ५९४ सार्वजनिक मूर्ती, १ हजाराहून अधिक घरगुती मूर्ती, ११५ सार्वजनिक तर ३४० घरगुती प्रतिमा, ६६ सार्वजनिक तर ४ हजार ७३ घरगुती घटांचं विसर्जन झालं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading