सुप्रसिध्द अभिनेते शरद पोंक्षे यांना पी सावळाराम तर अभिनेत्री उषा नाईक यांना गंगाजमुना पुरस्कार प्रदान

गेले वर्षभर आपण दुर्धर आजाराशी सामना करत होतो परंतु येणा-या नव्या वर्षात नव्या दमाने उभं राहण्याकरिता ठाणे
महापालिकेनं दिलेला जनकवी पी सावळाराम हा पुरस्कार आपल्याला नवी उमेद देणारा आहे असं मत ज्येष्ठ अभिनेते शरद
पोंक्षे यांनी व्यक्त केलं. ठाणे महापालिका आणि जनकवी पी सावळाराम कला समितीच्या वतीनं महापौरांच्या हस्ते शरद पोंक्षे
यांना अभिनय क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल जनकवी पी सावळाराम पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं त्यावेळी सत्काराला
उत्तर देताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. मराठी चित्रपट क्षेत्रात काम करत असताना पी सावळाराम यांचे आशीर्वाद आपल्याला
लाभले आणि आज त्यांच्या नावानं आपल्याला मिळालेला गंगाजमुना पुरस्कार हा अभिमानाची बाब असल्याचं मत ज्येष्ठ
अभिनेत्री उषा नाईक यांनी व्यक्त केलं. उषा नाईक यांनाही यावेळी गौरवण्यात आलं. ५१ हजार रूपये रोख आणि
सन्मानचिन्ह असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप होतं. यावेळी साहित्य क्षेत्रातील विशेष कामगिरी बद्दल प्रशांत डिंगणकर यांना
तर शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल प्राध्यापक बाळासाहेब खोल्लम यांना आणि लक्षवेधी कलाकार म्हणून गायिका माधुरी
करमरकर यांना सन्मानित करण्यात आलं. २१ हजार रूपये रोख आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरूप होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading