शिवाईनगर येथील श्रीगजानन मंडळ ट्रस्ट ठाणे यांचा रौप्य महोत्सव मोठ्या भक्तीभावानं साजरा

शिवाईनगर येथील श्रीगजानन मंडळ ट्रस्ट ठाणे यांचा रौप्य महोत्सव मोठ्या भक्तीभावानं साजरा करण्यात आला. रौप्य महोत्सवानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. वर्धापन दिनानिमित्त परिषा सरनाईक, विहंग सरनाईक, सुलेखा चव्हाण अशा अनेक मान्यवरांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. दोन दिवस सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांमुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झालं होतं. १९९८ साली श्रीगजानन मंडळ ट्रस्टची स्थापना झाली असून या मंडळातर्फे विविध उपक्रम चालवले जातात. वर्धापन दिनानिमित्त दोन दिवस गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी लोटली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading