शब-ए-मेराज आणि शब-ए-बारात उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे महापालिकेचं आवाहन

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी शब – ए – मेराज आणि शब – ए – बारात हा उत्सव अत्यंत साधा पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे. कोविडमुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी शब-ए-मेराज आणि शब-ए- बारात उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. शब-ए-मेराज आणि शब-ए-बारात निमित्त सर्व मुस्लीम धर्मीय बांधव आपापल्या विभागातील मशिदीत रात्रभर नमाज, कुराण आणि दुवा पठण करतात. त्यामुळे बहुसंख्य मुस्लीम वस्तीत रात्रभर मुस्लीम बांधवांची वर्दळ असते. तसेच काही ठिकाणी वाझ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कोविडमुळे संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी ११ मार्च रोजीची रात्र आणि १२ मार्चची पहाट या कालावधीत शब-ए-मेराज तर २८ मार्च रोजीची रात्र आणि २९ मार्चची पहाट या कालावधीत येणाऱ्या शब-ए-बारात या उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे मिरवणुकांचे आयोजन न करता मशिदीत अथवा घरातच दुवा पठण करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. स्थानिक मशिदीत नमाज पठणाकरीता येणाऱ्या मुस्लीम बांधवांनी कोणत्याही प्रकारची गर्दी न करता एका वेळी ४० ते ५० व्यक्तींनी टप्याटप्याने सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करून दुवा पठण करावे. कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही आणि त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन होईल याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading