वामनराव ओक रक्तपेढी आणि सरस्वती मंदिर ट्रस्ट संचलित पालक-शिक्षक संघाच्या वतीनं १ नोव्हेंबरला रक्तदान शिबीराचं आयोजन

वामनराव ओक रक्तपेढी आणि सरस्वती मंदिर ट्रस्ट संचलित पालक-शिक्षक संघाच्या वतीनं येत्या १ नोव्हेंबरला रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे अनेक गोष्टींवर जसा परिणाम झाला आहे तसाच रक्तदानावरही खूपच परिणाम झाला आहे.
त्यामुळे रक्तदान-शिबिरे घेण्यात अडचणी येत आहेत तसेच विविध गैरसमजामुळे रक्तदाता घाबरून घरी बसत असल्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णालयांतून ऑपरेशन्स, थालेसामिया, डायलायसिस आणि गंभीर आजारांसाठी सातत्याने मागणी होत असून या शिबीरात येऊन रक्तदान करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. १ नोव्हेंबरला नौपाड्यातील सरस्वती मंदिर ट्रस्ट येथे सकाळी ९ ते १२.३० या वेळेत रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. शिबीरा मध्ये रक्तदान करण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. त्यामुळे निरोगी रक्तदात्यांनी निश्चिंतपणे येऊन रक्तदान करावे. यामुळे आजारी रुग्णांना मदत तर होईलच आणि आपल्यालाही एका मोठ्या सामाजिक कार्यास हातभार लावल्याचे समाधान मिळेल. थंडी, ताप, सर्दी, खोकला झालेल्या व्यक्तींनी रक्तदानाला येऊ नये. अन्य सर्वांनी रक्तदानासाठी अवश्य पुढे यावे.
वेळ निश्चिती करण्यासाठी २५३९२४४० आणि ९८३३७८५५२९ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading