रुग्णालयात प्रवेश नाकारल्याने रुग्णालयाच्या बाहेरच एका महिलेची प्रसूती

कल्याणच्या स्काय वॉक वर मोलमजुरी करून राहणाऱ्या सकीना नावाच्या महिलेला पोटात दुखत असल्याचा कॉल महात्मा फुले पोलिसांना येताच दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी स्कायवॉक वर धाव घेत या महिलेचा शोध घेतला. पोलिसांनी इतर महिलांना मदतीसाठी पाचारण करत तिला तातडीने सर्वांनी मिळून या महिलेला प्रसूतीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. मात्र ड्युटीवरील डॉक्टरांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. रुग्णालयात दाखल असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना पोलिसांनीही अनेक वेळा विनंती केली. यादरम्यान या महिलेची जवळपास प्रसूती होत आल्याने अखेर इतर महिलांनीच रुग्णालयाच्या बाहेरील रस्त्यावर या महिलेची प्रसूती केली. अखेर याबाबत वरिष्ठ पोलिसांनी रुग्णालयातील वरिष्ठांना कळविल्यानंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी या महिलेला आत नेत बाळाची महिलेसह बाळाला प्रसूती केंद्रात धाडले. मात्र या घटनेमुळे पालिकेची आरोग्य व्यवस्था कशी आहे हे समोर आले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading