राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे होळी पौर्णिमेला रोटी डे उपक्रम

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे होळी पौर्णिमेला म्हणजे २८ मार्चला रविवारी रोटी डे आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत रस्ता, स्टेशन, बस स्टँडवर उपाशीपोटी, अर्धवट उपाशी झोपणाऱ्या समाजबांधवांना पुरणपोळी वाटली जाते. या पुरणपोळ्या घरांघरातून गोळा केल्या जातात. घरटी किमान एक पुरणपोळी देण्यात यावी एवढीच अपेक्षा असते. पुरणपोळी शक्यतो कागदी पिशवीत किंवा स्वच्छ कागदात गुंडाळून द्यावी. त्याचप्रमाणे वामनराव ओक रक्तपेढीच्या मागे असलेल्या प्रताप व्यायामशाळेतही येत्या रविवारी रात्री ८ ते १० या वेळेत या पुरणपोळ्या गोळा केल्या जाणार आहेत. इच्छुकांनी आपल्याकडील पुरणपोळ्या या ठिकाणी द्याव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे. यासाठी अमोल लिमये यांच्याशी ९९८७०२४०५८ या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading