राष्ट्रीय लोकन्यायालयात जिल्हा न्यायालयात २२ हजार ६७८ प्रकरणांत तडजोड

जिल्हा न्यायालय आणि ठाणे, पालघर जिल्ह्यातील न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण १० हजार ३८० प्रलंबित आणि १२ हजार २९८ दाखलपूर्व अशा एकूण २२ हजार ६७८ प्रकरणांमध्ये तडजोड झाली, अशी माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम. आर. देशपांडे यांनी दिली. प्रलंबित प्रकरणांमध्ये एकूण ४४ कोटी ८८ लाख ४६ हजार ४२९ रुपये व दखलपूर्व प्रकरणांमध्ये एकूण रू ५ कोटी ३८ लाख ३२ हजार ९०२ रुपये अशी एकूण रु. ५० कोटी २० लाख ७९ हजार ३३२ रुपये एवढया रकमेचा समावेश असलेली प्रकरणे लोकअदालतीमध्ये तडजोडीने मिटली. मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणात एकूण २३९ प्रकरणांत तडजोड झाली. पिडीतांना रक्कम २१ कोटी २९ लाख ९९ हजार ६६४ रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. सदर प्रकरणांपैकी ठाणे मुख्यालयात एकूण १७७ प्रकरणांमध्ये तडजोड होवुन १४ कोटी १६ लाख ९२ हजार ६६४ रुपये एवढी नुकसान भरपाई पिडीतांना मंजुर करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading