रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत सुनील देवधर गुंफणार पहिलं पुष्प

रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला शनिवार ८ जानेवारीपासून सुरू होत असून पहिले पुष्प सुनील देवधर गुंफणार असल्याची माहिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे हे ३६ वे वर्ष आहे. गेल्या वर्षी प्रमाणेच नौपाडा येथील सरस्वती सेकंडरी स्कुलच्या हॉल मधे कोरोना नियमांचे पालन करून ८ ते १४ जानेवारी या काळात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून रोज रात्री ८.१५ वाजता व्याख्यानास सुरुवात होणार आहे. व्याख्यानमालेचे उदघाटन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील देवधर यांच्या हस्ते होणार असून हिंदुत्व – सावरकर, विवेकानंद – दीनदयाळजी या विषयावर ते विचार मांडणार आहेत. रविवार ९ जानेवारी रोजी देवदत्त पट्टनायक हे कृष्ण ब्रह्मांड रूप या विषयावर तर सोमवार १० रोजी बिव्हीजी ग्रुपचे संस्थापक हणमंत गायकवाड हे मराठी पाऊल पडते पुढे या विषयावर विचार मांडतील. ११ जानेवारीस प्रख्यात सायबर वकील अॅड. डॉ. प्रशांत माळी हे सायबर गुन्हेगारी या विषयावर प्रबोधन करतील तर १२ जानेवारीस कवी महेश केळुस्कर, नीती मेहंदळे आणि जयश्री जोशी हे जय शारदे वागेश्वरी हा कार्यक्रम सादर करतील. १३ जानेवारीस डॉ. शेखर कुलकर्णी हे आरोग्य आणि जीवन शैली या विषयावर तर शेवटच्या दिवशी सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे हे व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प गुंफणार आहेत. कार्यक्रमास फक्त प्रवेशिका धारकांनाच प्रवेश देण्यात येणार असून मास्क लावणे बंधनकारक असेल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading