रामनवमी भक्तांविनाच साजरी

आज श्रीरामनवमी आहे. मात्र आजची रामनवमी भक्तांविनाच साजरी झाल्याचं दिसून आलं. सध्या सर्वत्र कोरोनानं कहर माजवला असून शासनानं कोरोना नियंत्रणासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे सर्व मंदिरं बंद असून यामध्ये रामाचीही मंदिरं बंद आहेत. राम जन्म हा दुपारनंतर होतो मात्र सध्या कोरोनाचं लॉकडाऊन सुरू असून सर्वसामान्य माणसाला बाहेर फिरण्यास मनाई आहे. ठाण्यातील बहुतांश राम मंदिरं आज बंद होती. मंदिरातील पुजा-यांनी राम जन्मोत्सव साजरा केला असला तरी तो अगदी काही ठराविक भक्तांच्या उपस्थितीतच साजरा झाला. सर्वसामान्य राम भक्ताला राम मंदिरात जाऊन रामनवमी उत्सव साजरा करण्यास मनाई होती. त्यामुळं आजची रामनवमी भक्तांविना साजरी झाली.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading