येत्या रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेचे आयोजन येत्या रविवारी 20 सप्‍टेंबर रोजी करण्यात आले आहे. पल्स पोलिओ नियमित लसीकरणे या अंतर्गत ही मोहिम राबविण्यात येणार असून सर्व लसी प्रत्येक विभागातील आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध करण्यात आल्या असून त्याचा लाभ पालकांनी 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना द्यावा असे आवाहन महापौरांनी केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओचे समुळ उच्चाटन करण्याचे ध्येयनिर्धारीत केले असून त्या पार्श्वभूमीवर भारतात सातत्याने पल्स पोलिओ विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येते. गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रीय पल्सपोलिओ लसीकरण मोहिम ठाणे महापालिकेने उत्कृष्टपणे राबविली आहे. येत्या रविवारी विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असून, या मोहिमेतंर्गत एकही बालक पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी बुथवर आणि त्यानंतर पुढील पाच दिवस प्रत्येक घरोघरी जाऊन लाभार्थींचा शोध घेऊन त्यांना पोलिओ चे डोस देण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading