मोबाईल डिस्पेंसरीमध्ये 4 हजार पोलिसांची तपासणी – 114 बाधीत

कोरोनाचा पोलीस दलावर होणारा परिणाम रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत असून ठाणे शहर आयुक्तालयात 26 जून ते 10 जुलै या कालावधीत मोबाईल डिस्पेंसरी सेवा सुरू करण्यात आली होती. एका वाहनात ही डिस्पेंसरी क्लिनिक असून त्याद्वारे आयुक्तालय परिक्षेत्रात असलेल्या 35 पोलीस ठाण्यातील तब्बल 4 हजाराहून अधिक पोलिसांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत लक्षणे दिसणाऱ्या 431 पोलीसांपैकी 114 जण पॉझिटीव्ह आढळल्याने पुढील उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली. कोरोना काळात मदतीसाठी पोलीस देवदूत बनून काम करीत आहेत. कठीण काळातील पोलिसांच्या या सेवेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. असे असले तरी या महामारीची सर्वाधिक झळ पोलिसांना पोहचत आहे. ठाण्यातही कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय आणि भारतीय जैन महासंघ, देश अपनाये, एमसीएचआई-क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जून ते 10 जुलै या कालावधीत मोबाईल डिस्पेंसरी सेवा सुरू करण्यात आली होती. आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या 35 पोलीस ठाण्यातील सुमारे 4 हजाराहून अधिक पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणी मोहिमेत कोरोना लक्षणे आढळलेल्या 431 पोलीसांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 114 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळल्याने या पोलिसांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading