माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचं निधन

माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. मुलुंडमधील खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. संपूर्ण आयुष्य शिक्षकांचे पश्न आणि समस्या सोडवण्यासाठी खर्ची घालणारे एक अभ्यासु व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे आमदार रामनाथ मोते शेवटपर्यंत शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढत राहिले. गेली १२ वर्ष विधान परिषेदेमध्ये कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या मोतेंच्या निधनामुळे शिक्षकांच्या लढ्याचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. ठाणे वार्तातर्फे रामनाथ मोते यांना विनम्र श्रध्दांजली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading