माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट दत्ता घुले यांनी आपलं एक महिन्याचे संपूर्ण वेतन पंतप्रधान सहाय्य निधीला दिले आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे देशासमोर आलेल्या आर्थिक अडचणीला तोंड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. त्याला विविध स्तरांतून चांगला प्रतिसादही मिळत आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आपली पेन्शन पंतप्रधान साहाय्य निधीला द्यावी असे आवाहनही दत्ता घुले यांनी केले आहे.