महाराष्ट्र दिन ध्वजारोहण समारंभ कोकण भवन ऐवजी ठाण्यात

कोकण भवन, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापनदिन ध्वजारोहणचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. असे विभागीय महसूल आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी कळविले आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनानं संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केलेले आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रदूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या परिपत्रकान्वये महाराष्ट्र दिनाचा 61 वा वर्धापन दिन साजरा करण्याबाबत दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार असल्याने ठाणे जिल्ह्याचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्र्याच्या हस्ते होणार आहे. विभागीय स्तरावरील कोकण भवन येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन समारंभाचे आयोजन करण्यात येणार नाही असं कळवण्यात आलं आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading