महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यु

ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागात कोरोनाने शिरकाव केला असुन या विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान आज पहाटे दुर्दैवी मृत्यु झाला. ठाणे पूर्वतील पारशीवाडीत राहणारे सुजीत नार्वेकर कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ, ठाणे या संघटनेचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा -मुलगी असा परिवार आहे. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातील सुजीत यांना ताप आल्याने 10 जून रोजी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मधुमेहाचाही त्रास होता. रुग्णालयात दाखल केल्यापासुन संघटनेचे राजु कांबळे, सुजीत लोंढे आदीनी नार्वेकर कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली. मात्र कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आज पहाटे ह्लदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यु ओढवला अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख संतोष कदम यांनी दिली. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन कक्षात कोरोनाचा शिरकाव झाल्याने कर्मचारी वर्ग धास्तावला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading