महापालिका हद्दीत मे महिन्यात डेंग्यूचे 3 तर मलेरियाचे 28 रुग्ण

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मे महिन्यामध्ये डेंग्यूचे संशयित रुग्णसंख्या 10 आणि निश्चित निदान झालेले 3 रुग्ण आहेत. तर मलेरियाचे 28 रुग्ण आढळून आले तसंच चिकनगुनियाचा संशयित 1 रूग्ण असून निश्चित निदान केलेली रुग्णसंख्या शून्य आहे, यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी गृहभेटी देऊन एकूण 24 हजार 747 घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत 377 घरे दूषित आढळून आली. तसेच एकूण 35 हजार 793 कंटेनरची तपासणी केली असता 432 कंटेनर दूषित आढळून आली. या अनुषंगाने 50 हॅण्डपंप, 10 ट्रॅक्टर्स, 6 ई रिक्षा, 10 बोलेरो वाहनांमार्फत दोन सत्रात 1729 ठिकाणी औषध फवारणी आणि धुरफवारणी हॅण्डमशीनद्वारे 10 हजार 758 ठिकाणी धूरफवारणी करण्यात आली, तसेच 9 ठिकाणी गप्पी मासे सोडण्याचे कार्यक्रम राबविण्यात आले असल्याचे उपवैद्यकीय आरोग्य अधिकारी स्मिताली हुमरसकर यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading