महापालिका आयुक्तांनी केली विसर्जन व्यवस्थेची पाहणी

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या गणेशोत्सवामध्ये दीड दिवसाच्या गणेशमुर्तींचे विसर्जन करताना अनावश्यक गर्दी होवू नये तसेच विसर्जन व्यवस्था कशा पद्धतीने काम करीत आहे यासाठी महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी आज शहरातील विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली. त्याचबरोबर विसर्जनाच्या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या ॲंटीजन टेस्टींग बुथला भेट देवून त्या ठिकाणी जास्तीत जास्त गणेश भक्तांची चाचणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महापालिका आयुक्तांनी आज दुपारपासून शहरातील विसर्जन घाट आणि कृत्रीम विसर्जन तलावांची पाहणी करण्यास सुरूवात केली. सुरूवातीस त्यांनी मासुंदा येथील दत्त घाटाची पाहणी करून ॲानलाईन टाईम स्लॉट बुकिंग केलेल्या गणेश मुर्तीं विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला. त्याचबरोबर त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाचीही पाहणी केली. मासुंदा तलावाची पाहणी केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी मॉडेला चेक नाका येथील श्रीगणेश मुर्ती स्वीकृती केंद्राची पाहणी करून रायलादेवी कृत्रीम तलावांची पाहणी केली आणि विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर उपवन तलाव येथील कृत्रीम गणेश विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथील व्यवस्थेबाबत गणेश भक्तांशीही संवाद साधला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading