महापालिका आणि नगरपालिका हद्दीतील दुकानं येत्या ३ मे पर्यंत बंदच राहणार

महापालिका आणि नगरपालिका हद्दीतील दुकानं येत्या ३ मे पर्यंत बंदच राहणार आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असून ठाण्याचा समावेश हॉटस्पॉट मध्ये होतो अशा ठिकाणांची दुकाने येत्या ३ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. गृहमंत्रालयाने सामान्य दुकानांना ५० टक्के कामगारांसह काम करण्याची मुभा दिली असली तरी कामगारांना आणि ग्राहकांना मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आजपासून हा आदेश लागू झाला आहे. मॉल्स आणि वाईनची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही. दुकाने आणि आस्थापना परवाना असणा-यांनाच दुकाने उघडता येणार आहेत. संबंधित दुकाने सुरू ठेवायची किंवा नाही याचा निर्णय राज्य सरकारांवर सोपविण्यात आला आहे. राज्य सरकारांनी याला परवानगी दिल्यानंतरच ही दुकाने उघडता येणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading