भारतातील पहिली ई-व्हेईकल प्रयोगशाळा ठाण्याच्या ए पी शहा इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सुरू

भारतातील पहिली ई-व्हेईकल प्रयोगशाळा ठाण्याच्या ए पी शहा इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सुरू झाली आहे. ए पी शहा इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि गो गो फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. वाढतं प्रदूषण आणि भविष्यातील इंधनाचा धोका लक्षात घेता दळणवळणाचे पुढील साधन म्हणून इलेक्ट्रीक व्हेईकलकडे पाहिलं जात आहे. हीच गरज लक्षात घेऊन कुशल अभियंते तयार व्हावेत आणि त्यांना नोकरीच्या तसंच व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्दिष्टानं ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. या ई-व्हेईकल प्रयोगशाळेच्या उद्घाटन समारंभास महाविद्यालयाचे विश्वस्त पूजा शहा, कॉवेस्ट्रो जर्मन कंपनीचे विक्री प्रतिनिधी आणि सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading