बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार या दसऱ्या मेळाव्यातून दिले जातील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री पद रुबाब दाखवण्यासाठी नाही. या पदाचा वापर सर्वसामान्यांसाठी झाला पाहिजे. दसरा मेळावा जोरात होणार आहेच. यावर्षीच्या मेळाव्यात चिन्ह आणि पक्ष आपल्यासोबत असल्याने खरी बाळासाहेबांची शिवसेना आली. गेल्या महिन्यात शिवसेनेच्या खात्यातील 50 कोटींचे पैसे मागण्याचे पत्र आलाय. मी विलंब न लावता पैसे परत करायला सांगितलेत असे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केले, दसरा मेळावा संदर्भात आयोजित एका बैठकीत ते बोलत होते. यांना फक्त पैसा आणि प्रॉपर्टी पाहिजेत, दसरा मेळाव्याच्या सूचना आपण पळायच्या आहेत. आपला दोन्ही दसरा मेळावा रेकॉर्ड ब्रेक झाला. 2:5 ते 3 लाख शिवसैनिक होते. पोलिसांचा आकडा आहे. कार्यकर्त्यांना जपलं पाहिजे. निवडणुकीवेळी उमेदवाराला कार्यकर्ता चांगला वाटतो. पण निवडणूक झाल्यानंतर ही तीच भवन असायला पाहिजे. हा नियम माझ्या सकट सर्वांना लागू आहे. एक ही आमदारांने मला विचारलं नाही की आपण कुठे चाललोय. निर्णय जो घेतला तो घेतला. शिवसेना आणि हिंदुत्व वाचवण्यासाठी तो निर्णय घेतला. समाजवादी परिवारनंतर उद्या MIM सोबत ही हे युती करतील. बाळासाहेब हिंदुत्वाची रोखठोक भूमिका मांडायचे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार या मेळाव्यातून दिले जातील. आम्ही पूर्वी शिवतीर्थावर ट्रक च्या टपावर बसून जायचो. आज मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ताच मानतो. मैदानासाठी वादविवाद नको मी म्हटलं होतो यापुढे शिवाजी पार्कच्या मैदाणासाठी अर्ज करायचं नाही.
येणाऱ्या 2024 च्या लोकसभेच्या निवडणुका आपल्याला जिंकायचा आहेत. ही तयारीची बैठक आहे पुढे त्यावर बोलेन. सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडणार पडणार पण सरकार पडलं नाही ते अजून मजबूत होत गेलं 215 आमदार झाले, नंतर मुख्यमंत्री बदलणार हे सुरू झालं. कोर्टाचा निर्णय ही आपल्या बाजूनेच लागणार.
शासन आपल्या दारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे त्यांना धडकी भरली आहे असा टोलाही कोणाचाही नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading