बदलापूर येथे अस्नोली नदीत बुडून दोघाजणांचा मृत्यू झाला. बदलापूर येथील अस्लनोली नदीमध्ये काल संध्याकाळच्या सुमारास सिध्देश सावंत आणि बाळकृष्ण केदारे हे दोघेजण पोहण्यासाठी गेले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने सिध्देश सावंत हा युवक बुडाला आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेले बाळकृष्ण केदारे यांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.