नौपाड्यातील बेडेकर विद्या मंदिर शाळेच्या गल्लीमध्ये ड्रेनेजचे झाकण गेल्या १५ दिवसांपासून धोकादायक अवस्थेत

नौपाड्यातील बेडेकर विद्या मंदिर मराठी माध्यमाच्या शाळेच्या गल्लीमध्ये असलेले ड्रेनेजचे झाकण गेल्या १५ दिवसांपासून गटाराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे उचलले जाते आहे. पावसाचा जोर वाढताच हे झाकण ड्रेनेजच्या भोकापासून वर उडते आहे. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे हे ड्रेनेज होल दिसत नाही. परिणामी शालेय विद्यार्थ्यांच्या गर्दीच्या वेळेस शालेय विद्यार्थी या खड्ड्यात पडून अपघात घडण्याची दाट शक्यता असल्याची रहिवासी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेक जणांनी अनेक शासकिय कार्यालयांना आणि शासकीय अधिकाऱ्यांना तक्रार करूनही समस्येवर कोणतीही ठोस उपाययोजना पालिकेकडून करण्यात आली नसल्याचेही रहिवाशांनी सांगितले. मलनि:स्सारण विभाग आणि आपत्कालीन परिस्थिती नियोजन पथक यांनी येऊन पाहाणी करून देखील आजही परिस्थिती जैसे थे असल्यामुळे नागरीक आणि पालक यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच पालिका अधिकारी अपघात झाल्यानंतरच उपाययोजना करणार का असा सवालही नागरीकांनी उपस्थित केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading