नौपाडा येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे हॉस्पिटलचा कोविड-१९ म्हणून वापर करावा अशी मागणी ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने यांनी केली आहे. महापालिका आयुक्तांकडे एका पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. ठाण्यात कोविड रोगाचा प्रसार झपाट्याने होत आहे आणि रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बेड्सचा तुटवडा भासत आहे. अश्यावेळी नौपाडा येथील तीन पेट्रोल पंप भागातील “इंडियन रेडक्रॉस सोसायटी” चे हॉस्पिटल कुलुपात बंद स्थितीत दिसत आहे. या ठिकाणी शंभर नागरिकांना विलगीकरणासाठी ठेवता येईल असं मोने यांनी पत्रात म्हटलं आहे.