नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांची प्रभागातील नागरिकांना अनोखी भेट

नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांच्या प्रयत्नाने आणि पाठपुराव्याने जगातील काही निवडक प्रसिद्ध वास्तुंची थ्रीडी प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. ज्या नागरिकांना परदेशी जाऊन ह्या वास्तु प्रत्यक्ष पाहता येत नाही अथवा त्या वास्तूंबरोबर फोटो काढता येत नाही. त्यामुळे नागरिकांसाठी हे मुरल्स वेगळी पर्वणीच ठरणार आहेत. प्रभागातील कोरस रोड, रुणवाल प्लाझा येथील फुटपाथ सुशोभीकरणाच्या माध्यमातून सात आश्चर्याची थ्रीडी प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. ज्याचे सर्वांनाच आकर्षण आणि कुतूहल आहे. तसेच २००१ साली लोकमान्य नगर पाडा नं. ४, टी.एम.टी. बस डेपोच्या चौकात लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारून लोकमान्य टिळक चौक बनविण्यात आला होता. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून चौकाची निगा- दुरुस्ती होत नसल्यामुळे कालांतराने चौकाची दुरावस्था झाली होती. ज्या लोकमान्य टिळकांच्या नावाने ह्या नगराला ओळखले जाते त्या लोकमान्य टिळकांच्या चौकाचे सुशोभीकरण करून चौकाला नवीन झळाळी देण्याचा स्थानिक नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांचा मानस होता. विचारांती ज्यांच्या नावाने चौक आहे त्यांच्या नावाला साजेसा चौक असावा त्यादृष्टीने लोकमान्य टिळक चौकात लोकमान्य टिळक यांच्या जीवनचरित्रावरती शिल्प उभारून आणि नव्याने बांधणी करून चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले.
या दोन्ही सुशोभीकरण कामांचे लोकार्पण करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading