नगरसेवक नारायण पवार यांना पितृशोक

मुरबाड तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी, कृषी सोसायटीचे माजी चेअरमन शंकरराव पवार यांचे आज दीर्घ आजाराने ठाण्यातील रुग्णालयात निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांचे ते वडील होत. मुरबाड तालुक्यातील टोकावडे परिसरात शंकरराव पवार यांची प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळख होती. ते शेतकऱ्यांची प्रगती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत होते. त्यांनी कृषी सोसायटीचे चेअरमनपदही भूषविले होते. मुरबाड तालुक्यातील आदिवासींच्या प्रश्नांसाठी ते कार्यरत होते. तालुक्यातील गरीब व गरजू रुग्णांवर ठाण्यातील रुग्णालयात उपचार होण्यासाठी ते मदत करीत असत. त्यांनी पोलिस पाटील पदावरही काम केले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्याकडून सुरुवातीला उपचारांना प्रतिसाद मिळाला. मात्र, आज दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर टोकावडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading