ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन

प्रत्येक वर्षी महाराष्ट्र शासनाकडून माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांच्या कल्याणाकरीता सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे ठराविक उद्दीष्ट प्रत्येक जिल्हयासाठी दिले जाते. जिल्हाधिका-यांनी २०२० साठी दिलेल्या उद्दिष्टांपैकी ठाणे महापालिकेनं ११ लाख ९० हजार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे यांनी स्वत: दखल घेवून दिलेल्या अवधीच्या ५ महिने अगोदरच रुपये १० लाखांचं उद्दीष्ट पूर्ण केले आहे. शासकीय कार्यालयांनी त्यांना देण्यात आलेलं सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिका-यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading