दिव्यातील एका १५ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

दिव्यातील एका १५ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. आज दुपारी अडीचच्या सुमारास साबेगाव येथे ३ मुले पोहण्यासाठी गेली होती. आयुष नागरे, अमन गुप्ता आणि कार्तिक नाईक हे तिघेजण पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने यातील कार्तिक नाईक हा मुलगा बुडाला. ठाणे अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवानांनी घटनास्थळी जाऊन शोधमोहिम सुरू केली. यावेळी कार्तिक नाईक याचा मृतदेह त्यांना मिळाला. मुंब्रा पोलीसांच्या ताब्यात हा मृतदेह देण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading