दिवा रेल्वे स्टेशन पूर्व ते वाशी रेल्वे स्टेशन अशी बससेवा सुरू

ठाणे परिवहन सेवेने मुंब्रा, दिवा, रेतीबंदर, कल्याणफाटा या परिसरातील चाकरमानी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सोईसाठी दिवा रेल्वे स्टेशन ते वाशी रेल्वे स्टेशन अशी बससेवा सुरू केली आहे. 21 मार्चपासून ही दिवा रेल्वे स्टेशन पूर्व ते वाशी रेल्वे स्टेशन मार्ग क्रमांक 141 अशी नव्याने बससेवा सुरू केली असून या बससेवेचा फायदा निश्चित दिवा परिसरातील नागरिकांना होणार आहे. या मार्गावर पहिली बस सकाळी 6.50 वाजता तर शेवटची बस रात्री सव्वा आठ वाजता आहे. तसंच एन.जी.रिजन्सी (बाळकूम) ते ठाणे स्टेशन पश्चिम मार्ग क्रमांक 83 एकूण 12 बसफेऱ्या देण्यात आल्या असून या मार्गावर पहिली बस सकाळी 7 वाजता आणि शेवटची बस रात्री 10 वाजता आहे. मुंब्रा पोलीस स्टेशन ते शिवाजी चौक (भिवंडी) मार्ग क्र. 84 वर एकूण बस फेऱ्या 20 देण्यात आल्या असून या मार्गावर पहिला बस सकाळी 7 वाजता आणि शेवटची बस रात्री 10 वाजता आहे. गोल्डन डाईज जंक्शन (माजिवडा नाका)ते राजनोली नाका/ कल्याण बायपास मार्ग क्र. 86 वर एकूण बस फेऱ्या 8 देण्यात आल्या असून या मार्गावर पहिली बस सकाळी 8.20 वाजता तर शेवटची बस रात्री 8.55 वाजता आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading