डॉ. बेडेकर शुश्रृषालय हे जागतिक मान्यता मिळवणारं राज्यातील पहिलं रूग्णालय

ठाण्यातील डॉ. बेडेकर शुश्रृषालय हे जागतिक मान्यता मिळवणारं राज्यातील पहिलं रूग्णालय ठरलं आहे. जागतिक स्त्री रोग संघटना आणि महाराष्ट्र राज्य यांनी डॉ. बेडेकर शुश्रृषालयावर ही मान्यतेची मोहर उमटवली आहे. जागतिक स्त्रीरोग संघटना आणि महाराष्ट्र शासनानं रूग्णालयांसाठी किमान मानकं ठरवली आहेत. प्रसुतीगृहात प्रशिक्षित परिचारिका, तज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक तंत्रज्ञान, शस्त्रक्रिया विभाग अशा विविध बाबी तपासून ही मान्यता दिली जाते. अशी मान्यता डॉ. बेडेकर शुश्रृषालयाला मिळाली आहे. यामुळं अशी मान्यता मिळवणारं राज्यातलं हे पहिलं रूग्णालय ठरलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading